इश्यू क्या है ? महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं आवश्यक, काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर, बघा व्हिडिओ

इश्यू क्या है ? च्या माध्यमातून मुंबई लाइव्हनं सर्वच पक्षांच्या उमेदवारांना बोलतं केलं. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना उत्तर मुंबई लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

  • इश्यू क्या है ? महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं आवश्यक, काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर, बघा व्हिडिओ
SHARE

इश्यू क्या है ? च्या माध्यमातून मुंबई लाइव्हनं सर्वच पक्षांच्या उमेदवारांना बोलतं केलं. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना उत्तर मुंबई लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुंबई लाइव्हशी संवाद साधताना त्यांनी थेट महिलांच्या प्रश्नांमध्ये हात घातला. महिलांची सुरक्षा, महिलांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आणखी आवश्यक ती पावलं उचलण्याची गरज असल्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.


देशात सध्या फॉरेन पॉलिसी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं आवश्यक ते बदल करण्याची आवश्यकता असल्याचं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. परंतु आपल्या वक्तव्यांना चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात असल्याचं सांगत त्यांनी याबाबत अधिक भाष्य करण्याचं टाळलं. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या आवडीनिवडी, अभिनेत्री ते नेता हा प्रवास, राजकारणाची आवड याबाबतही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
हेही पाहा -

इश्यू क्या है ? डम्पिंग ग्राऊंडमुळं रहिवासी पडताहेत आजारी, काय म्हणाले संजय दिना पाटील? बघा व्हिडिओसंबंधित विषय
ताज्या बातम्या