मी निवडणूक लढवणार ‘ही’ तर निव्वळ अफवा- माधुरी दीक्षित

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच नुकतंच उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच माधुरी दीक्षितही राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आपण कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार नसून ती निव्वळ अफवा असल्याचं सांगत आपल्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

कामावर लक्ष केंद्रीत

आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेलो नसून आपण निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचं माधुरी दीक्षित यांनी स्पष्ट केलं. तसंच यापूर्वीदेखील आपण याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. बॉलिवूडमधील अन्य दोन जणांविषयीदेखील अशाच अफवा पसरल्या असल्याचंही तिनं स्पष्ट केलं. सध्या राजकारणापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचंही तिनं यावेळी बोलताना सांगितलं.


हेही वाचा -

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात; गोपाळ शेट्टींविरोधात रंगणार सामना

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा भरणार अर्ज


पुढील बातमी
इतर बातम्या