उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा भरणार अर्ज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी अहमदनगरच्या गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. परंतू, अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवरी रात्री फोनकरून उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.

SHARE

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी अहमदनगरच्या गांधीनगरमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवरी रात्री फोन करून उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळं उद्धव ठाकरे शनिवारी अमित शहा यांच्या निमंत्रणावरून गांधीनगरमध्ये हजर राहणार आहेत. त्याशिवाय अर्ज भरताना अमित शहा शिवसेना-भाजपाच्या एकजुटीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील असं म्हटलं जात आहे.


उद्धव ठाकरेंची उपस्थिती

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणार असून ते अहमदाबाद येथील गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील उपस्थित रहावं, अशी त्यांची इच्छा होती. शहा यांच्या निमंत्रणानुसार उद्धव ठाकरे गांधीनगरमध्ये जाणार आहेत. दरम्यान, गांधीनगरमधून लालकृष्ण आडवाणी लोकसभा निवडणूक लढत होतो. मात्र, यंदा अमित शहा गांधीनगर निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, अमित शहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये ४ किलोमिटरची रथयात्रा काढणार आहेत. नरेनपुरा विधानसभा मतदारसंघापासून ही रथयात्रा निघणार असल्याचं समजतं आहे.हेही वाचा -

दरवाजावर निळे दिवे लावलेली लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी विजयसंबंधित विषय
ताज्या बातम्या