Advertisement

लोकलच्या दरवाजाला निळे दिवे, अपघात रोखण्यासाठी उपाय

मध्य रेल्वेनं निळा दिवा संपूर्ण लोकलमध्ये कार्यान्वित करून त्याची गुरुवारी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यानं निळा दिवा लावलेली लोकल शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.

लोकलच्या दरवाजाला निळे दिवे, अपघात रोखण्यासाठी उपाय
SHARES

धावती लोकल पकडताना होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं लोकलच्या प्रत्येक दरवाजावर निळ्या रंगाचे दिवे बसविण्याची योजना आखली होती. या योजनेनुसार, दरवाजाला निळे दिवे लावलेली एक लोकल शुक्रवारी सेवेत दाखल झाली आहे. लोकल सुरू होताना दरवाजाला लावलेले दिवेही पेटणार असून यामुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे.  


निळ्या रंगाचे दिवे

धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे निळ्या रंगाचे दिवे लोकलमधील एका डब्यातील दरवाज्यांवर बसविण्यात आले होते. त्याच लोकलमधील १२ डब्यांच्या दरवाजांवर असे दिवे बसविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


सेफ्टी फर्स्ट

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये लोकल सुरू होताना दरवाजावर निळा दिवा पेटताना दिसत होता. तसंच, दिवा तीन-चार वेळा चालू-बंद झाल्यावर लोकल प्लॅटफॉर्मवरून रवाना होत होती. त्याशिवाय 'सेफ्टी फर्स्ट लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येक डब्याच्या दरवाजाच्या वर निळया रंगाचा दिवा लावण्यात आला असून हा दिवा प्रवाशांना लोकल सुरू झाल्याचे सूचित करेल. त्यामुळं लोकलमध्ये चढताना होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील’, असं पीयूष गोयल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीलं होतं.



हेही वाचा -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी विजय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा