शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होणारे चंपासिंह थापा आहेत तरी कोण?

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहाय्यक आणि मातोश्रीचा सेवक अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

मला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पटतात. तसंच एकनाथ शिंदे यांचेही विचार पटतात. आपल्या मनाने जो कौल दिला तो मी मान्य केला आणि मी शिंदे गटात आलो असं सांगत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण का आलो हे थापा यांनी स्पष्ट केलं आहे.

चंपासिंह थापा यांची शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहाय्यक अशी ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या इतक्या जवळील व्यक्ती शिंदे गटात जाणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण, हे चंपासिंह थापा आहेत तरी कोण? हे जाणून घेऊयात.

बाळासाहेबांचे सेवक

पोटाची खळगी भरण्यासाठी चंपा सिंह थापा हे नेपाळहून भारतात आले होते. सुरुवातीला त्यांनी मिळतील ती कामे केली. गोरेगावमध्येच त्यांना छोटी-मोठी का होईना पण त्यांच्या हाताला काम लागत होते. कामामुळेच त्यांची ओळख भांडूपमधील नगरसेवक के.टी.थापा यांच्यासोबत झाली.

के.टी. थापा यांच्यासह ते एकदा मातोश्रीवर गेले. बाळासाहेबांनी त्यांना मदतनीस म्हणून ठेवले. १९८०-८५ पासून ते बाळासाहेबांसोबत सावली सारखे असायचे. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीशेजारी त्यांची एक लहान खोली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा, जाहीर सभांमध्ये चंपासिंह थापा असायचेच. यासोबतच मीनाताई ठाकरे यांच्या अकाली निधनानंतर थापा यांनी बाळासाहेबांच्या औषधांच्या वेळा सांभाळणे, त्यांची सेवा करणे या सर्व जबाबदाऱ्या ही ते पार पाडत होते.

नेपाळमध्ये शिवसेनेला हातभार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा विस्तार करण्याच्या पहिल्या प्रयोगाला थापा यांचा मोठा हातभारही लागला आहे. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापाची भूमिका महत्त्वाची होती.

थापाचे कुटुंब नेपाळात, तर दोन मुले दुबईत असतात. वर्षांतून कधीतरी ते कुटुंबियांकडे जातात.


हेही वाचा

नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणारच! सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

maharashtra"="" target="_blank">Maharashtra Political Saga: उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा महत्त्वाचा का आहे?">Maharashtra Political Saga: उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा महत्त्वाचा का आहे?

पुढील बातमी
इतर बातम्या