मनोज कोटक यांच्यासमोर तोगडीयांचा उमेदवार रिंगणात

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी हिंदुस्तान निर्माण दल नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. याबरोबरच त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेसाठी आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उत्तर पूर्व आणि ठाण्यातून आपला हिंदुस्तान निर्माण दल आपला उमेदवार उतरवणार आहे.

१६० उमेदवार उतरवणार

हिंदुस्तान निर्माण दलानं मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून निलेश कुडतरकर आणि ठाणे मतदारसंघातून ओमकार तिवारी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त पक्ष भाजपाव्यतिरिक्त १६० उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे तोगडीया देशभरात फिरून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत.

पार्टीचा प्रमुख मुद्दा

सत्तेत आल्यास आम्ही आठवडाभरातच एक अध्यादेश पारित करून राम मंदिराचं काम सुरू करणार असल्याची माहिती तोगडीया यांनी दिली. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मालालाही योग्य भाव देणार असून शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असल्याचं ते म्हणाले.


हेही वाचा -

कुर्ला स्थानकावरील 'त्या' लिबू सरबत विक्रेत्याला ५ लाखांचा दंड

बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून ४६ लाखांच्या चेकची चोरी; एकाला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या