बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून ४६ लाखांच्या चेकची चोरी; एकाला अटक

मुंबईच्या कांदिवली येथील एका नामांकित बँकेच्या ड्रॉप बाँक्समधून ४६ लाखांचे चेक चोरी करणाऱ्या एका पुण्याच्या तरुणास कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. अशोक गावडे असं या तरुणाचे नाव असून बँकेतील सीसीटीव्ही आणि फेसबुकच्या माध्यमातून पोलिसांनी त्याची ओळख पटवत अटक केली.

बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून ४६ लाखांच्या चेकची चोरी; एकाला अटक
SHARES

मुंबईच्या कांदिवलीतील एका नामांकित बँकेच्या ड्राॅप बाॅक्समधून ४६ लाखांचे चेक चोरी करणाऱ्या पुण्याच्या एका तरुणाला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. अशोक गावडे असं या तरुणाचं नाव असून बँकेतील सीसीटीव्ही आणि फेसबुकच्या माध्यमातून पोलिसांनी ओळख पटवत त्याला अटक केली.


सीसीटीव्हीतून चोरी उघड

कांदिवली पश्चिमेकडे कॉर्पोरेशन बँकेची शाखा आहे. या बँकेच्या आत इतर बँकांच्या शाखाचे चेक टाकण्यासाठी ड्राॅप बाॅक्स ठेवण्यात आला आहे. या बाॅक्समधील चेक पुढे नोंदणी करून पाठवले जातात. सोमवारी या बाॅक्समध्ये जमा झालेले ५९ चेक स्कॅनिगसाठी बांधून ठेवलेले होते. ४६ लाख, ३३ हजार, ५९४ रुपयांचे हे चेक होते. मात्र, स्कॅनिंगच्या वेळी हा गठ्ठा मिळत नसल्याने शोधाशोध करण्यात आली. बँकेतील सीसीटीव्ही तपासण्यात आले असता एक व्यक्ती हा गठ्ठा घेऊन जात असल्याचं दिसलं. चेक चोरीला गेल्याचं लक्षात येताच बँक व्यवस्थापकांनी कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


आधारकार्डावरून शोध

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण बँकेत खात्याबाबत चौकशी करण्यासाठी आला असल्यामुळे त्याची नोंद सापडली. नोंदवहीत त्याचं नाव अशोक गावडे असं नमूद करण्यात आलं होतं. तसंच नोंदणी वहीत आधारकार्डनंबरही त्यानं लिहिला होता. पोलिसांना आधारकार्ड नंबर तपासून पाहिला असता तो पुण्याचा अशोक गावडेचाच असल्याची खात्री पटली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज असस्पष्ट असल्यामुळं पोलिसांनी फेसबुकवर अशोक गावडेचा शोध घेतला.

त्यावेळी अशोकचं प्रोफाइल पोलिसांच्या हाती लागलं. त्यानुसार त्याची माहिती जमा करून कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली. अशोक हा मूक असल्याचं पोलिसांच्या चौकशीत पुढे आलं. पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीचे ५९ चेक हस्तगत केले आहेत.




हेही वाचा-

माहीममधून ३ कोटींचं परदेशी चलन जप्त

जमिन बळकवल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा