जमिन बळकवल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला अटक

खंडाळा येथील चार एकर एकाच जागेवर असलेल्या जमिनीवर बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला यांची नजर होती. मात्र ही जमीन कुणाच्या नावावर आहे याची माहिती मिळत नव्हती. तसंच कुणीही ही जमीन विक्री करण्यासाठीही पुढे येत नव्हते. त्यावेळी युसुफ लकडावाला आणि मोहन नायर नावाच्या व्यक्तीने या जमिनीचे बनावट कागदपत्र बनवले.

जमिन बळकवल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला अटक
SHARES

खंडाळा येथील चार एकर जमीन  बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला(७४) आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. लकडावाला विमानाद्वारे लंडनला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. 


खोटी कागदपत्रं

खंडाळा येथे अनेक बड्या लोकांचे बंगले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जागेला मोठे भाव आहेत. येथील चार एकर जागेवर असलेल्या जमिनीवर बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला यांची नजर होती. मात्र ही जमीन कुणाच्या नावावर आहे याची माहिती मिळत नव्हती. तसंच कुणी ती जमिनी विक्री करण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यावेळी युसुफ लकडावाला आणि मोहन नायर नावाच्या व्यक्तीने या जमिनीचे बनावट कागदपत्र बनवले. तसंच अॅफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन करत, त्याने या जमिनीचा खोटा खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे दाखवून ते मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केले. 


अहमदाबादहून अटक

लकडावालाने सादर केलेल्या कागदपत्रांच्या छाननीत ही कागदपत्रे खोटी असल्याचं पुढे आल्यानंतर जितेंद्र बडगुजर यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा लकडावालासह मोहन नायर नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी लकडावालाला याला शुक्रवारी अहमदाबाद येथून अटक केल्याचं पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितलं. लकडावालाला ट्रान्झिट रिमांडवर शनिवारी मुंबई आणण्यात येणार आहे. आरोपीने ऍफेडिव्हीट कम डीड ऑफ कन्फर्मेशन बनावट केल्याचा आरोप आहे. तसंच न झालेला व्यवहार या कागदपत्रांच्या सहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. तसंच हा प्रकार उघड होऊ नये यासाठी मुंबईतील नोंद करण्यात आलेले नोंदणी क्रमांक वापरले. तसंच मूळ कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी लकडावाला अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्याच्या प्रयत्न असताना त्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. 



हेही वाचा -

माहीममधून ३ कोटींचं परदेशी चलन जप्त

आयपीएलवर दहशतवादाचं सावट?




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा