रश्मी ठाकरे यांना पितृशोक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचं सोमवारी अल्पशा आजाराने निधन झालं. ते 78 वर्षांचे होते.  अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार  सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

रश्मी ठाकरे यांचं माहेर डोंबिवली इथलं आहे. रश्मी ठाकरे यांनी पितृशोक झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या  सोमवारी होणाऱ्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.


हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह


पुढील बातमी
इतर बातम्या