एकनाथ शिंदेंकडं आरोग्य खात्याचा अतिरिक्त पदभार

डॉ. दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या आरोग्य खात्याचा अतिरिक्त पदभार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कालावधी ७ जानेवारीला म्हणजेच आज संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

मंत्रिपदासाठी लॉबिंग 

विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांला सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागते.  या नियमानुसार, डॉ. दीपक सावंत यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली होती. मुदत संपल्यानंतर फक्त सहा महिने पदावर राहू शकता येते. पण त्यानंतर मंत्रीपदाचा

राजीनामा देणं बंधनकारक असतं. दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू होतं. आता एकनाथ शिंदेंकडे आरोग्य विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे


हेही वाचा -

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा


पुढील बातमी
इतर बातम्या