Advertisement

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा


आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा
SHARES

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानं  यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आरोग्य खात्याचा अतिरिक्त भार शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता व्यक्त होत अाहे.


मी नाराज नाही

डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. ते नाराज असल्याचं मत देखील अनेकांनी व्यक्त केलं होतं. मात्र, यावर स्पष्टीकरण देत दीपक सावंत यांनी चर्चांना पुर्णविराम दिला आहे. "माझ्या राजीनाम्याशी नाराजीचा काही एक संबंध नाही. विधान परिषदेचं सदस्यत्व संपल्यानं मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. तसंच मला नव्या जबाबदारीची अपेक्षा आहे," असं स्पष्टीकरण डॉ. सावंत यांनी दिलं.


सावंत यांच्या जागी कोण?

विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांला सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा नियम आहे. या नियमानुसार, डॉ. दीपक सावंत यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली होती. त्यानंतर सोमवारी ७ जानेवारी रोजी सहा महिन्यांची मुदत संपल्यानं डॉ. दीपक सावंत यांना आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रीपदासाठी दुसर नावं सुचवावं याबाबत चर्चा केली असून सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.


हेही वाचा

अमितच्या विवाहसोहळ्याचं आमंत्रण देण्यास राज ठाकरे मातोश्रीवर

ठरलं! काँग्रेस-राष्ट्रवादीचा लोकसभेसाठी ५०-५० फाॅर्म्युला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा