Advertisement

अमितच्या विवाहसोहळ्याचं आमंत्रण देण्यास राज ठाकरे मातोश्रीवर

येत्या २७ जानेवारी रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा मुंबईतील सेंट रेजिस या अलिशान ठिकाणी पार पडणार आहे. डिसेंबर महिन्यात नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी अमित आणि मितालीच्या लग्नाची पत्रिका अर्पण केली होती.

अमितच्या विवाहसोहळ्याचं आमंत्रण देण्यास राज ठाकरे मातोश्रीवर
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे येत्या २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. या विवाह सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.


मोजक्या पाहुणे आमंत्रित

येत्या २७ जानेवारी रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाहसोहळा मुंबईतील सेंट रेजिस या अलिशान ठिकाणी पार पडणार आहे. डिसेंबर महिन्यात नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी अमित आणि मितालीच्या लग्नाची पत्रिका अर्पण केली होती. तसंच २०१७ च्या डिसेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला असून मिताली बोरूडे ही पेशानं फॅशन डिझायनर आहे. राज ठाकरे हे अमितचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं करणार असून लग्नासाठी काही मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार आहे. 


राहुल गांधींनाही निमंत्रण

सध्या राज ठाकरेंच्या घरी लगीनघाई सुरु झाली असून नववर्षाचा मुर्हत साधून राज ठाकरे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचरणी लग्नपत्रिका अर्पण केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे स्वत: लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेत आहेत. येत्या काही दिवसात नवी दिल्लीत जाऊन भाजप- काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देणार असून यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा