कालिदास कोळंबकर बनले विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड केली आहे. राजभवनात जाऊन कोळंबकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

कोळंबकर वडाळा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. सलग आठवेळा जिंकून येणारे कोळंबकर विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार बनले आहे. त्यांच्या ज्येष्ठतेनुसारच राज्यपालांनी त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. 

दरम्यान बहुमत चाचणी होण्याआधीच भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अवघ्या ४ दिवसांत फडणवीस सरकार कोसळलं आहे. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बहुमत चाचणी झाल्यास विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोळंबकर आपल्या पदाचा मान राखून कर्तव्य बजावतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. 


हेही वाचा-

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामा

बुधवारीच बहुमत चाचणी घ्या, गुप्त मतदानही नको- सर्वोच्च न्यायालय


पुढील बातमी
इतर बातम्या