उद्धव ठाकरेच घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!

फडणवीस सरकार अवघ्या ८० तासांत कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असतील, हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या वृत्ताला राट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला आहे. उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून पुढचे ५ वर्षे कार्यरत राहतील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनीही त्याला होणार दिल्याची माहिती त्यांनी दिली.

तर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनाच महाविकास आघाडीचं नेतृत्व करेल. तसंच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतर्फे सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देतील, असं सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील हे दोघेही उपमुख्यमंत्रिदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


हेही वाचा-

राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी केला 'हा' विक्रम

भाजपचा अहंकार संपवला- नवाब मलिक


पुढील बातमी
इतर बातम्या