Advertisement

राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी केला 'हा' विक्रम

अवघ्या चार दिवसांत राजीनामा देऊन फडणवीस यांनी आता एक विक्रम केला आहे.

राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी केला 'हा' विक्रम
SHARES

बुधवारी बहुमत सिद्ध  होण्याची कसलीच शक्यता नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा दिला. अवघ्या चार दिवसांत राजीनामा देऊन फडणवीस यांनी आता एक विक्रम केला आहे.  सर्वाधिक कमी काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. 

२३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी दिला. मात्र, आपले सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर फक्त चारच दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. सर्वात कमी काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवणारे फडणवीस हे पहिलेच आहेत. यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता.

तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाल्यानंतर २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३ या काळात बाळासाहेब सावंत काळजीवाहू मुख्यमंत्री होते. ते फक्त ९ दिवस मुख्यमंत्री होते. याआधी एवढ्या कमी काळ कुणीच मुख्यमंत्रीपद भुषवले नव्हते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी हा विक्रम मोडला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवघ्या चार दिवसांत मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची वेळ ओढावली आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची ५ वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली होती. काँग्रेसचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते.



हेही वाचा -

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामा

अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा