“दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”, ठाकरे सरकारमधील मंत्री संतापला

दिल्लीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आता उग्र स्वरूप धारण केल्याचं दिसत आहे. यामुळे मोदी सरकारची चांगलीच कोंडी झाली असून शेतकरी आंदाेलनाची धार बोथट करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. असेच आरोप करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांना महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलच सुनावलं आहे.

काय म्हणाले दानवे?

सध्या सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. पण हा कायदा झाल्यापासून अजूनपर्यंत एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणाही रावसाहेब दानवे यांनी केली. दानवे यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

हेही वाचा- ‘दिशा’ वरून नितेश राणेंनी केलं आदित्य ठाकरेंना लक्ष्य

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे (maharashtra government) राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

तर त्याआधी, भाजपाच्या नेत्यांना किती मस्ती आणि उन्माद आहे हे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. दानवे स्वत: अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था पाहतात. त्यांनी जबाबदारीने बोलणं अपेक्षित आहे. दिल्लीत पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी येऊन आंदोलन करत आहेत, असं म्हणणं यावरुन भाजपच्या शेतकऱ्यांसाठी काय भावना आहेत हे दिसून येतं, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दानवे यांच्यावर टीका केली आहे. 

(maharashtra state minister bacchu kadu slams bjp leader raosaheb danve over farmers protest)

हेही वाचा- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत विशेष काय?
पुढील बातमी
इतर बातम्या