Advertisement

‘दिशा’ वरून नितेश राणेंनी केलं आदित्य ठाकरेंना लक्ष्य

दिशा कायद्याचं नाव बदलून ‘शक्ती’ असं करण्यात आल्याने भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यटनमंत्रणी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

‘दिशा’ वरून नितेश राणेंनी केलं आदित्य ठाकरेंना लक्ष्य
SHARES

महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत ‘दिशा’ कायद्याला मंजुरी दिली. परंतु या कायद्याचं नाव बदलून ‘शक्ती’ असं करण्यात आल्याने भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यटनमंत्रणी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

‘दिशा’ कायद्याला (Disha) बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. राज्यात दिशा कायद्याला मंजुरी देण्यात आल्यामुळे महिलांसाठी मोठं सुरक्षा कवच निर्माण झालं आहे. यानुसार एखाद्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोषी व्यक्तीला जन्मठेपेऐवजी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याला राज्यात ‘शक्ती’ असं नाव देण्यात अला आहे. या कायद्यानुसार आता फास्ट ट्रॅकवर आरोपींना शिक्षा करण्यात येणार आहे.

हेही वाचा- ‘दिशा’ कायद्याला मंत्रीमंडळात मंजुरी

या बदलण्यात आलेल्या नावावरून, महाराष्ट्र सरकार शक्ती नावाचा नवा कायदा आणत असल्याने मला आनंद झाला आहे. सहाजिकच या कायद्याचं आधीचं नाव दिशा होतं, पण ते बदलून शक्ती ठेवण्यात आलं. हे नाव का बदललं हे मी समजू शकतो. या कायद्याअंतर्गत कारवाई करताना राज्य सरकार कोणत्याही खटल्यात भेदभाव करणार नाही, अशी मला अपेक्षा आहे. अगदी सध्या एका प्रकरणात संशयित असलेले युवा कॅबिनेट मंत्री असले, तरी खटल्याचा निकाल नि:पक्षपातीपणे दिला जाईल, असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्याकडे बोट रोखलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध असल्याचा दावा सातत्याने राणे पितापुत्रांकडून करण्यात येत आहे. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे या तिघांनी वारंवार या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), मुंबई पोलीस आणि आदित्य ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत संशयाचं जाळं विणलं. तर सुशांत सिंहची आधीच मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू देखील संशयास्पदरितीने झाल्यामुळे या प्रकरणात देखील आदित्य यांना खेचण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ‘दिशा’ या शब्दावरून आदित्य ठाकरेंचं नाव न घेता नितेश राणे यांनी पुन्हा त्यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

(bjp mla nitesh rane criticises aaditya thackeray and maharashtra government over disha act)

हेही वाचा- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत विशेष काय?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा