Live updates - मराठा क्रांती मोर्चा: मुंबई, ठाण्यातील वाहतूक विस्कळीत

मराठा क्रांती मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. म्हणूनच 'मूक' मोर्चाचं रुपांतर आता 'ठोक' मोर्चात झालं आहे. औरंगाबादमध्ये आंदोलनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बुधवारी बंदची हाक दिली आहे. 

बंदचे प्रत्येक अपडेट्स

6.18 - कळंबोलीत पुन्हा रास्ता रोको, पोलिसांकडूनही लाठीचार्ज सुरू

5.04 - मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग सुरू

5.03 - कळंबोलीतील रास्ता रोको ६ तासांनंतर मागे 

4.47- तब्बल ३ तासानंतर ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे सुरू

4.38 - अांदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चर्चेचं निमंत्रण

4.37 - मराठा क्रांती मोर्चाला स्थगिती देऊनही कळंबोलीजवळ मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग अांदोलकांनी रोखला

3.15- आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूराचा मारा, लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार

3.12 - ठाण्यातील नितीन कंपनीजवळ आंदोलनकर्त्यांची दगडफेक, 

2.37 - आंदोलकांना शांतता राखण्याचं मराठा क्रांती मोर्चाचं आवाहन - पवार
2.35 - मराठा क्रांती मोर्चाचा मुंबई बंद स्थगित, समन्वय विरेंद्र पवार यांनी केलं जाहीर

2.30 - सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद

2.20 - दिंडोशीसह गोरेगाव नागरीनिवारात बसवर दगडफेक

2.18 - ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक बंद, ठाणे-वाशी, ठाणे-नेरुळ वाहतूक बंद 

2.15 - हार्बर रेल्वे सेवा बंद

2.10 - ठाणे-घणसोलीत वाहतूककोंडी

2.05 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय-वे बंद

2.03 - कळंबोलीत पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज

2.00 - कळंबोलीत पोलिसांच्या गाड्या पेटवल्या, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

1.50 - खारघरमध्ये आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला

1.45 - कळंबोलीत आंदोलकांवर लाठीचार्ज

1.40 - सायन-पनवेल महामार्गावर 501 क्रमांकाची बस अज्ञातकडून जाळण्याचा प्रयत्न. कंडक्टरने प्रसंगावधान बाळगून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला

1.35 - आंदोलनकर्त्यांनी वाकोल्यात दुकानं बंद करायला लावली

1.30 - वरळीत मुंडन आंदोलन

1.25 - आंदोलनकर्त्यांनी मानखुर्द येथे बस पेटवली, अग्निशमन दलाने आग विझवली

1.17 - आंदोलनकर्त्यांचं एरोलीत रेल्वे रोको

1.00 - कळंबोलीत पोलिसांचा हवेत गोळीबार

12.55 - कळंबोलीत आंदोलकांनी पोलिसांवर केली दगडफेक

12.50 - मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांच्याशी बातचीत

12.45 - चेंबूर घाटला व्हिलेज

12.40 - वाशी येथे 501 क्रमांकाच्या बसमधील आसनं जाळली

12.28 - नालासोपारा पुर्वे-पश्चिमेकडील उड्डाणपूल आंदोलनकर्त्यांनी केला ब्लॉक

12.15 - कांदिवलीतील दुकानं केली बंद

12.11 - खारघरमध्ये रुग्णवाहिकेला जाण्यास मार्ग केला मोकळा

12.10 - आमदार मधू चव्हाण हे देखील आंदोलनात सहभागी

11.59 - कांदिवलीत चारकोप परिसरात रिक्षातून लोकांना उतरवलं

11.36 - कल्याण स्टेशनबाहेर बसची तोडफोड

12.05 - रास्तारोको आंदोलनामुळे प्रवाशांची कोंडी 

 

12-00 - दादर (पूर्व) मराठा मोर्चा

11.58 -आंदोलनकर्त्यांनी वाशीजवळ सायन-पनवेल हाय-वे रोखून धरला

11.57 - आंदोलनकर्ते दादर पूर्वेडील हिंदमाता परिसरात दाखल

11.50 - कळंबोलीजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे रोखलं

11.45 - मुलुंड टोलनाक्याजवळ आंदोलनाला हिंसक वळण

11.40 - कल्याण स्टेशनबाहेर बसची तोडफोड

11.35 - वाशीत मोर्चेकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

 

11.33 - नालासोपारा स्टेशनकडे जाणारी रिक्षा आणि बस वाहतूक बंद, आंदोलकांनी रस्त्यावरील फेरीवल्यांना उठवत दुकानं केली बंद    

11.30 - नालासोपाऱ्यात उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

11.28 - आंदोलकर्ते कल्याण स्टेशनमध्ये  

11.25 - खार पूर्वेकडील जवाहरनगरमध्ये आंदोलनकर्त्यांनी दुकानं केली बंद

11.20 - नवी मुंबईत वाशी रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा नाही

11.12 - खारघरमध्ये दुकानं बंद, रस्त्यावर शुकशुकाट

11.10 - नवी मुंबईत शाळा बंद

11.09 - दादर पूर्वेकडून हिंदमाताकडे निघालेल्या मोर्चात 40 ते 50 मोर्चेकरी सहभागी 

11.03 - खारघर, नवी मुंबईत शुकशुकाट

11.00 - आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारी म्हणून मुंबईतील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद

10.55 - ठाण्यात रेल्वे रोको आंदोलन

10.53 - दादरमधील वाहतूक सुरळीत, आंदोलकांची दादर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी

10.50 - दादर पूर्वेला आंदोलकांची घोषणाबाजी

10.47 - आंदोलनकर्त्यांनी जागृती मेट्रो स्टेशनबाहेर मेट्रोचं काम थांबवण्याचा केला प्रयत्न

10.45 - मराठा मोर्चा - वांद्रे (पूर्व)

10.42 - दादरमध्ये मोर्चाला सुरुवात

10.40 - आतापर्यंत 9 बसेसची तोडफोड

10.37 -

 

10.35 - कांदिवली पूर्वेकडील रस्ता आंदोलकांनी रोखून धरला

10.30 - घंसोली रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे रोखून धरली, ट्रान्सहार्बर लोकल वाहतूक विस्कळीत 

10.16 - काकासाहेब शिंदे या तरुणाला श्रद्धांजली वाहून वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात आंदोलनाला सुरुवात 

10.15 - कांदिवली चारकोप परिसरात आंदोलकांनी बस रोखल्या

10.10 - प्लाझा जवळ मोर्चाला सुरुवात

10.05 - 

10.02 - शिवडीत मराठा मोर्चाला सुरुवात

10.00 - परळ-शिवडी भागात आंदोलनकर्ते रस्त्यावर

9.57 - चित्रा सिनेमाजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

9.52 - हिरानंदानी इस्टेट येथून ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेसच्या टायर जाळळल्या 

923 - एरोली ते वाशीपर्यंत बेस्टच्या सर्व बसेस बदं 

9.21 - ठाणे इस्टर्न फ्रीवेवर आंदोलनकर्ते रस्त्यावर

9.17 - मुंबई रिक्षा, मेट्रो, रेल्वे सुरळीत सुरू

9.15 - मुंबईच्या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

9.11 -

9.10 - कल्याण - बंदच्या पार्श्वभूमीवर काही शाळांनी सुट्टी जाहीर

9.05 - ठाणे - वागळे इस्टेट परिसरात टीएमटीच्या बसची तोडफोड

9.00 - मुलुंड - मुलुंडहून वाशीच्या दिशेने जाणारी बेस्टची बस सेवा ऐरोलीपर्यंतच सुरू

8.55 - कांदिवलीच्या हनुमाननगरमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावर

 

8.30 - तीनहात नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी, मुंबईकडे येणारी वाहतूक रोखली

8.25 - ठाणे - आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री हाय हायच्या दिल्या घोषणा

8.10 - ठाण्यात वागळे इस्टेट परिसरात टीएमटी बसची तोडफोड

या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईसह ठाणे, पालघर रायगड बंदची हाक दिली. मात्र हा बंद शांततापूर्ण मार्गाने असेल, यामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे निर्देश समन्वय समितीने दिले. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवांसुविधा वगळण्यात आलं आहे. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयंही सुरू राहतील. मात्र रस्त्यावर खासगी वाहनांना उतरू देणार नसल्याचं म्हणत हा आक्रोश सरकारविरोधात असल्याचं मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केलं आहे. 

हा बंद शांततेत पार पडणार असून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीनं जाहीर केलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


हेही वाचा -

आज मुंबई बंद! मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या