Advertisement

आज मुंबई बंद! मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय


आज मुंबई बंद! मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
SHARES

मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला असून मराठा मोर्चानं आता हिंसक वळण घेतलं आहे. सोमवारी औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलनादरम्यान गोदावरीच्या पात्रात बुडून काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं बुधवारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, सातारा या परिसरात बंदची हाक दिल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी दिली. यातून अत्यावश्यक सेवा आणि शाळांना वगळण्यात आलं आहे.


शांततेत मोर्चा


- विरेंद्र पवार, महाराष्ट्र समन्वयक समिती, अध्यक्ष, मुंबई


मुख्यमंत्र्यांचा निषेध

मराठा आरक्षणासंबंधीच्या आंदोलनाची पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी मंगळवारी दुपारी दादरच्या शिवाजी मंदिर इथं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचाही ठराव मांडण्यात आला. शिवाय बंद दरम्यान कुठलीही तोडफोड वा कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलं आहे.


आता ठोक मोर्चा

गेल्या २ वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज शांततेत मूक मोर्चाद्वारे आंदोलन करत आहे. तर दुसरीकडं न्यायालयीन लढाईही लढत आहे. परंतु २ वर्षांनंतरही हा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं मूक मोर्चाचं रूपांतर ठोक मोर्चात झालं आहे. याचा परिणामही बघायला मिळू लागला आहे. मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून मुंबई, पुणे, सातारा आणि पंढरपूरला वगळण्यात आलं होतं. आरक्षणाच्या मुद्दयावर आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चानं मुंबई बंदची हाक दिल्याने पुन्हा वातावरण चिघळणार आहे.


कडकडीत बंद

शिंदे यांच्या मृत्यूनंतर औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना मुख्यमंत्री वा सरकार काहीही करत नसल्यानं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून उचलून धरली जात आहे.

 


हेही वाचा-

पेड लोक मराठा आंदोलनात शिरले- चंद्रकांत पाटील

मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची 'पंढरपूर वारी' रद्द!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा