Advertisement

पेड लोक मराठा आंदोलनात शिरले- चंद्रकांत पाटील

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आतापर्यंत शांततेत सुरू असलेलं मराठा मोर्चा आंदोलन बदनाम करायच्या उद्देशाने काही पेड लोक मराठा आंदोलनात घुसले आहेत. कारण त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे.

पेड लोक मराठा आंदोलनात शिरले- चंद्रकांत पाटील
SHARES

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनकर्ते अाक्रमक झालेले असताना ''काही पेड लोक मराठा आंदोलनात घुसल्याचं'' वक्तव्य करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या भडक्यात तेल ओतण्याचं काम केलं आहे. पाटील यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


काय म्हणाले पाटील?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आतापर्यंत शांततेत सुरू असलेलं मराठा मोर्चा आंदोलन बदनाम करायच्या उद्देशाने काही पेड लोक मराठा आंदोलनात घुसले आहेत. कारण त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. मराठा आरक्षण देणं आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे जे आपल्या हातातच नाही त्यासाठी आंदोलन करून काहीही उपयोग होणार नाही. तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. पण यामुळे समाजाचं मोठं नुकसान होणार आहे हेसुद्धा आंदोलनकर्त्यांनी लक्षात घ्यावं,'


चर्चेचं निमंत्रण

निवडणुकीच्या काळात हिंसक आंदोलनाचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खऱ्या आंदोलकांनी या हिंसक प्रवृत्तींना आणि पेड आंदोलकांना बाजूला सारलं पाहिजे. सरकार आंदोलकांसोबत चर्चेसाठी केव्हाही तयार असल्याचं म्हणत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला मुंबईत चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण दिलं.



हेही वाचा-

मराठा क्रांती मोर्चाची उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांची 'पंढरपूर वारी' रद्द!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा