काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पून्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर आता उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेतून त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला आहे.

मिलिंद देवरा यांची नाराजी

दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनीही अंतर्गत गटबाजीबाबत उघडपणे मत व्यक्त केलं आहे. मिलिंद देवरा यांनी नुकतेच केलेल्या ट्विटमध्ये ‘मुंबई सारख्या शहरात सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. मात्र माझा दिल्लीतील पक्ष नेतृत्वावर पूर्ण विस्वास आहे. माझी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती आहे की, आपण एकत्र येऊन काम करायला हवं” असं म्हटलं आहे.

अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीनं शहरातील विभागांची चाचपणी करून काँग्रेसकडून 20 ते 22 संभावित उमेदवारांची यादी दिल्ली नेतृत्वाकडे पाठवली आहे. मात्र या उमेदवरांची अधिकृत घोषणा अद्याप काँग्रेसकडून करण्यात आलेली नाही. काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद हा काही नवा नाही. यापूर्वी ही दिवंगत नेते गुरूदास कामत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्ली हायकमांडकडे सूपुर्द करत नाराजी व्यक्त केली होती. तर काही दिवसांपूर्वी माजी खासदार प्रिया दत्त यांनी ही लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मिलिंद देवरा यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.


हेही वाचा

मनसेकडे मदत मागणाऱ्या शिल्पाने धरला काँग्रेसचा 'हात'

प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा? राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी

पुढील बातमी
इतर बातम्या