Advertisement

प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा? राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी

पूनम महाजन यांच्या टिकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई युवक काँग्रेसनं मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावून पूनम महाजन यांना काही सवाल केले आहेत. यावर पूनम महाजन काय उत्तर देतात हे पाहण औसुक्याचं ठरेल.

प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा? राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी
SHARES

भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘शकुनी मामा’ अशी ऐकेरी टिका केली होती. पूनम महाजन यांच्या या टिकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख उत्तर देण्यात आलं आहे. ‘अहो चिऊ ताई, देश की जनता यह जानना चाहती है?, प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?’ अशा आशयाचे पोस्टर राष्ट्रवादीकडून मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.


जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटरवरून ‘पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण शरद पवारांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो. आपल्या वडिलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, असा इशारा त्यांनी दिला.


युवक काँग्रेसची पोस्टरबाजी

ऐवढ्यावरच न थांबता राष्ट्रवादीच्या मुंबई युवक काँग्रेसनं मुंबईत ठिकठिकाणी 'महाभारत आणि रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती है? प्रविणने प्रमोद को क्यो मारा?’ अशा आशयाचे पोस्टर लावलेत. तर 'राजकारणात सुसंस्कृतपणा जपणंही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. वडिलांच्या नावावर पूनम महाजन निवडून आल्याचं त्या विसरल्याचीही टीका चित्रा वाघ यांनी केली होती.


काय बोलल्या होत्या पूनम महाजन?

सीएम चषकाचा बक्षीस समारंभ रविवारी चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या जाहीर सभेत एकवटलेल्या विरोधकांवर खासदार पूनम महाजन यांनी जहरी टिका केली. त्यावेळी पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यावर टिका केली. शरद पवार यांचा ऐकेरी उल्लेख करत, त्यांना रामायणातील 'मंथरा' आणि महाभारतातील 'शकुनी मामा' म्हणून पवारांचा उल्लेख केला. महाजन यांच्या या टिकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रतिउत्तर दिलंय.



हेही वाचा

अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावं - राज ठाकरे

पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा