Advertisement

पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. २७ फेब्रुवारीला लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे.

पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार
SHARES

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी २७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा लाँग मार्च पून्हा एकदा मुंबईत धडकणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी लाँग मार्चचं आयोजन केलं होतं. त्यावेळी सरकारनं मागण्या मान्य करत लवकरच त्या पूर्ण करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं. मागण्या मान्य होऊनही त्याची अमलबजावणी न झाल्यानं किसानं सभेनं लाँग मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी हा मोर्चा मुंबईत दाखल होणार आहे.


शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. यंदाच्या मोर्चात नाशिक, ठाणे, पालघर, पुण्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होणार आहेत. नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पल्ला गाठत हा मोर्चा मुंबईत धडकणार असल्याची महिती किसान सभेनं दिली. या मोर्चात सहभागी होणारे शेतकरी आपल्या शिधाची व्यवस्था स्वतःच करणार असून इतर व्यवस्थेसाठी कामगार संघटनांनी ५ लाखांची मदत दिली आहे. 20 मार्च रोजी हा मोर्चा नाशिकहून निघणार असून 27 फेब्रुवारी रोजी हा मोर्चा मुंबईत दाखल होईल


...नाहीतर महाराष्ट्र बंद

सरकारनं या लाँग मार्चकडे दुर्लक्ष केल्यास कामगारही शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील. त्याचप्रमाणे सर्व संघटना आणि पक्षांच्या नेत्यांना सामावून घेण्यात येईल. वेळ पडल्यास महाराष्ट्र बंदचीही हाक देऊ  अशी माहिती डॉ. डी.एल. कराड यांनी दिली.


हेही वाचा

अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावं - राज ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा