फडणवीस सरकारची शिकार महाराष्ट्र करेल; व्यंगचित्रातून राज यांचा फटकारा

अवनी वाघिणीच्या शिकारीचा मुद्दा राज्यभर सध्या गाजत अाहे. याच शिकारीवरून अाता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अापल्या कुंचल्याचा फटकारा फडणवीस सरकारला मारला अाहे. राज यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात २०१९ मध्ये फडणवीस सरकारची शिकार महाराष्ट्र करेल असं दाखवलं अाहे. 

व्यंगचित्रातून फटकारलं

काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये अवनी वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात अाले. या शिकारीवरून मोठा गदारोळ उठला अाहे. विरोधी पक्ष अाणि प्राणीप्रेमींनी फडणवीस सरकार अाणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरलं अाहे. याप्रकरणी मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात अाली अाहे. राज यांनीही सरकारला व्यंगचित्रातून चांगलंच फटकारलं अाहे. २०१९ मध्ये राज्य सरकारची अवस्था काय असेल हे त्यांनी व्यंगचित्रातून मांडलं आहे.

सत्ताधाऱ्यांना माज 

व्यंगचित्रात राज यांनी महाराष्ट्राला वाघाच्या रुपात दाखवलं आहे. सत्ताधाऱ्यांना माज आला अाहे. ज्याप्रमाणे फडणवीस सरकारने अवनीची शिकार केली त्याचप्रमाणे महाराष्ट्रही २०१९ मध्ये फडणवीस सरकारची शिकार करेल, असं राज यांनी व्यंगचित्रातून मांडलं आहे. 


हेही वाचा - 

कोरेगाव-भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री जबाबदार- प्रकाश आंबेडकर

२ मराठा आंदोलनकर्ते आयसीयूत, सत्ताधारी, विरोधकांना अचानक जाग


पुढील बातमी
इतर बातम्या