Advertisement

कोरेगाव-भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री जबाबदार- प्रकाश आंबेडकर

कोरेगाव-भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलिस जबाबदार असल्याची साक्ष चौकशी आयोगासमोर दिली. एवढंच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची माहिती मागवून मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करण्याची मागणी आयोगाला केली.

कोरेगाव-भीमा हिंसाचाराला मुख्यमंत्री जबाबदार- प्रकाश आंबेडकर
SHARES

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी मंगळवारी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. यावेळी त्यांनी हिंसाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलिस जबाबदार असल्याची साक्ष चौकशी आयोगासमोर दिली. एवढंच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची माहिती मागवून मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करण्याची मागणी आयोगाला केली.


दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी

सोमवारपासून कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या द्विसदस्यीय आयोगासमोर दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला सुरूवात झाली आहे. या सुनावणीअंतर्गत मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली.


'हे' देखील जबाबदार

कोरेगाव-भीमा इथं सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचाराला सुरूवात झाल्याची माहिती मिळाल्याबरोबर मी ग्रामीण पोलिसांशी संपर्क केला. मात्र पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिस प्रशासन जबाबदार आहेत. त्यामुळं या सर्वांची चौकशी व्हावी, त्यांनाही आयोगाने बोलवावं अशीही विनंती यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


भिडेंचा उल्लेख टाळला?

मुख्यमंत्री आणि पोलिस हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचं सांगतानाच प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांचा मात्र उल्लेख टाळल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बिनसरकारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये उपमहापौर सिद्धार्थ धेंडे होते. त्या समितीमार्फत तयार करण्यात आलेल्या अहवालाशी आपण सहमत नसून पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांच्या सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.



हेही वाचा-

८ दिवसांत भिडेंना पकडा, नाहीतर..., आंबेडकरांचं सरकारला अल्टिमेटम

डाव्या विचारवंतांना अटक : मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा