मनसेच्या महापालिका गटनेतेपदी संजय तुर्डे

शिवसेनेत गेलेले सहा नगरसेवक अजूनही तांत्रिकदृष्ट्या मनसेचेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी मनसेच्या गटनेतेपदी संजय तुर्डे यांची नेमणूक करण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून तुर्डे यांची महापालिका गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे कळवले आहे.

'त्या' नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी

मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे यांच्यासह सहा नगरसेवकांनी एकत्रपणे फुटून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रकरणी या सहाही नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. परंतु, त्यानंतर या सहाही नगरसेवकांना गट स्थापण्यास परवानगी देण्यापूर्वी आपल्याला सुनावणी द्यावी, तसेच त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यातील अपात्र ठरवण्याची याचिका कोकण विभागीय आयुक्त भारती लवंगारे यांनी दाखल करून घेतली.

महापालिकेची पुढील सभा २३ नोव्हेंबरला

या सहाही नगरसेवकांना गट स्थापन करण्यास परवानगी न दिल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांना पत्र लिहून मनसेचा महापालिका गटनेता म्हणून प्रभाग १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कळवले होते. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, की महापौर हे पत्र पुढील सभेत सभागृहात घेतात का? महापालिकेची पुढील सभा ही २३ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे तूर्तास या पत्रावर कोणताही निर्णय होणार नसून कोकण विभागीय आयुक्त यावर काय निर्णय घेतात? याकडेही लक्ष राहणार आहे.


हेही वाचा

'त्या' सहा नगरसेवकांना मनसेचा व्हीप

पुढील बातमी
इतर बातम्या