Advertisement

'त्या' सहा नगरसेवकांना मनसेचा व्हीप


'त्या' सहा नगरसेवकांना मनसेचा व्हीप
SHARES

मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांना पक्षाच्यावतीने पक्षादेश (व्हीप) जारी करण्यात आला. 6 फुटीर नगरसेवक आणि पक्षात असलेल्या संजय तुर्डे यांना हा व्हीप बजावताना, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुढील आदेश मिळेपर्यंत सभागृहाच्या तसेच समिती बैठकांच्या कोणत्याही मतदानात त्यांनी भाग घेऊ नये, असे आदेश बजावले आहे.


'ते' अजूनही मनसेचेच नगरसेवक'

हे सहाही नगरसेवक फुटून शिवसेनेत गेले असले तरी तांत्रिक दृष्ट्या ते अजूनही मनसेचेच नगरसेवक आहेत. त्यामुळे मनसेने हा व्हीप बजावला असल्याचे बोलले जाते. मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अश्विनी माटेगावकर, परमेश्वर कदम, अर्चना भालेराव आदी सहा नगरसेवकांनी एकत्रपणे फुटून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सहा नगरसेवकांनी याबाबत निवड कोकण विभागीय आयुक्त यांना दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

याबाबत शिवसेनेच्यावतीने कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे मनसेनेही कायदेशीर लढा सुरूच ठेवला असून या सहा नगरसेवकांचा शिवसेनेतील विलिनीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याप्रकर्णी मनसेला सुनावणी देण्याची मागणी पक्षाने केली आहे.


7 नगरसेवकांना व्हीप जारी

दरम्यान, एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांच्यामाध्यमातून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर आता मनसेने आपल्या 7 नागरसेवकांना व्हीप जारी केला आहे. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यँत महापालिका सभागृहात तसेच समिती बैठकांमध्ये मतदान करू नये, असे बजावले आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. पक्षादेश न पाळल्यास महापालिका नियमानुसार त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पक्षातून फुटून शिवसेनेत गेलेले नगरसेवक तांत्रिक दृष्ट्या अजून आमचेच असल्याचा दावा मनसेने केला. त्यामुळे त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा - 

'त्या' दोन मनसे नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

'तर' मनसेच्या गुंडाचा काँग्रेस समाचार घेईल : निरुपम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा