'त्या' दोन मनसे नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपाने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार एसीबीकडून कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

'शिवसेनेने पैसे देऊन नगरसेवक फोडले'

शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनीही आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याचा दावा केला होता. त्यावरून आता परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची चिन्हं आहेत.


हेही वाचा - 

फुकाचा तमाशा कि राजकीय आशा?


पुढील बातमी
इतर बातम्या