अमित ठाकरेंनी दिले मार्डला १००० पीपीई किट्स आणि मास्क

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी १ हजार पीपीई किट्स आणि मास्क मार्डकडे सुपूर्द केलेत. त्यानंतर मार्डनं अमित ठाकरेंना आभाराचं पत्र पाठवलं. त्यावर राज ठाकरेंनी फेसबुकवर पोस्ट करत डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलीय. तुम्ही आभार मानण्याची गरज नाही आमचं कुटुंबच तुमचं आभारी आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, आज अमितनं महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी १००० पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेकडे सुपूर्द केले त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले. पण हे डॉक्टर्स जसं जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझं कुटुंबच या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो.

दरम्यान, राज्यात आज ४४० नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ६८ झाली आहे. तर आज ११२ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या १ हाजर ११८ झाली आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ३५८ नवीन रूग्णांची नोंद झाली. विभागात ५ हजार ४०७ एकूण रुग्ण झाले आहेत. तर २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी राज्यात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील १२ तर पुणे महापालिका क्षेत्रातील ३ जळगाव येथील २ सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एक लाख १६ हजार ३४५ रुग्णांची तपासणी केली आहे. त्यात एक लाख सात हजार ५१९ रुग्णांची तपासणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर ८ हजार ६६८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या