मनसेच्या संदीप देशपांडेंनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अर्धा तास झालेल्या या भेटीमध्ये दोघांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली.  पवारांच्या कार्यपद्धतीने आपण प्रभावित झालो असून आपल्याला त्यांची भेट घेण्याची इच्छा होती. त्यानंतर ही भेट घडून आल्याचं समजत आहे. 

 बुधवारी राष्ट्रवादीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीआधी संदीप देशपांडे यांनी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या कामगिरीची माहिती देशपांडे यांनी पवारांना दिली. तर पुढील आठवड्यात शरद पवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं.

संदीप देशपांडे यांनी मनसेच्या तिकिटावर माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. देशपांडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली. माहीममध्ये मनसेचा पराभव का झाला याबाबतही पवारांबरोबर चर्चा केल्याचं समजतं.


हेही वाचा -

भाजपाने शिवसेनेला दिला 'हा' प्रस्ताव

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस


पुढील बातमी
इतर बातम्या