मनसे चिन्ह गमावणार?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे मनसे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) त्यांच्या पक्षाचे चिन्ह (symbol)  रेल्वे इंजिन आणि प्रादेशिक पक्षाचा दर्जा गमावू शकतात.

2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 जागा जिंकल्या होत्या. तर, 2014 आणि 2019 मध्ये पक्षाला प्रत्येकी एकच जागा मिळाली. मात्र यावेळी मनसेने सर्व जागा गमावल्या.

किंबहुना, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे (amit thackeray) यांना निवडणुकीत चांगली कामगिरी दाखवता नाही आली. कारण ते माहीम विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आले होते. या पराभवावर राज ठाकरे यांनी शनिवारी निकाल "अविश्वसनीय" असल्याचे ट्विट केले होते.

यावेळी राज्य विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत काळसे यांनी रविवारी सांगितले की, मनसे पक्ष त्यांच्या चिन्हावर दावा करू शकत नाही. कारण यावेळी त्यांनी एकही जागा जिंकली नाही. मनसे पक्षाला निवडणूक आयोगाद्वारे अपक्षांना वाटप केलेल्या मुक्त चिन्हांमधून निवड करावी लागेल.

राजकीय विश्लेषक, मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, “निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कोणत्याही पक्षाला पक्षाचा दर्जा आणि चिन्ह टिकवून ठेवण्यासाठी शून्य ते एक जागा असल्यास किमान आठ टक्के मते, तसेच दोन जागा असल्यास सहा टक्के आणि तीन जागा असल्यास तीन टक्के मते मिळणे आवश्यक आहे. 

मात्र यावेळी मनसेला 1.55 टक्के मते मिळाली. त्यामुळे मनसे पक्षाच्या चिन्ह टिकवून ठेवण्याच्या आशा मावळल्या आहेत.


हेही वाचा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार?

तूर्तास... पराभवानंतर राज ठाकरे म्हणाले

पुढील बातमी
इतर बातम्या