बृजभूषण सिंह मुंबईत येण्याच्या चर्चांना उधाण, मनसेनं दिला 'हा' इशारा

भाजप खासदार बृजभूषण (BJP MP Brijbhushan) सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागवी मगच अयोध्येत यावं, असा अल्टिमेटमच बृजभूषण यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांना दौरा रद्द करावा लागला होता.

आता बृजभूषण सिंह मुंबईत येऊन सभा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यावरून आता मनसेकडून बृजभूषण सिंह यांना कडकडीत इशारा देण्यात आलाय.

ब्रिजभूषण याने मुंबईत येऊन दाखवावे , त्याच्या तंगड्या हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, त्याला माझे निमंत्रण आहे हिम्मत असेल तर त्याने मुंबईत येऊन दाखवावे, असे खुले आवाहन मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज सोशल मीडियावर द्वारे केले आहे.

राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर राम लल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि या दौऱ्याची देशभर चर्चा सुरू झाली. मग अनेकांच्या पायखालची वाळू सरकू लागली. मग राज ठाकरेंना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. बृजभूषण सिंह यांचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर व्हायरल झाली. त्यांना महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली. त्यानंतर बृजभूष सिंह यांनी अशी भूमिका घेतली. मात्र आम्ही नेहमीच एकटे होतो. आम्हाला त्याने फरक पडत नाही, असेही खेडेकर म्हणाले आहेत.

तसेच औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यावर काही बोलणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. समस्त मराठी माणसाला डुबवणाऱ्या नालायकाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.


हेही वाचा

शिवसेना नेते यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स, ईडीकडून होणार चौकशी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल

पुढील बातमी
इतर बातम्या