Advertisement

शिवसेना नेते यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स, ईडीकडून होणार चौकशी

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या घरावर छापा टाकून दोन कोटी रुपये रोख, लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

शिवसेना नेते यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स, ईडीकडून होणार चौकशी
SHARES

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी (Income Tax raid) करण्यात आल्यानंतर आता ईडी (ED)चा ससेमीरा मागे लागण्याची शक्यता आहे.

यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स विभागाकडून यशवंत जाधव यांचे घर, मालमत्तावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून समन्स आल्याने यशवंत जाधव अडचणीत येताना दिसत आहेत. (ED summons Shiv Sena leader Yashwant Jadhav)

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यशवंत जाधव यांची संपत्ती आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तपासाला वेग आला आहे.

यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी, या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांत आयकर खात्याने या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली.

यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅट आहे. 25 फेब्रुवारीला आयकर विभागानं माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे.

यशवंत जाधव यांचे भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आले आहेत त्यापैकी 26 फ्लॅट Newshawk Multimedia Pvt Ltd कंपनीच्या नावे नोंद आहेत. Newshawk Multimedia Pvt Ltd.

कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केलं होतं. वांद्रे येथील फ्लॅट आणि याशिवाय यशवंत जाधव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हाताळणाऱ्या 14 संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.



हेही वाचा

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल

गजानन काळेंकडून शरद पवार-बृजभूषणसिंहांचा फोटो ट्विट, म्हणाले “ब्रिज”चे निर्माते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा