Advertisement

गजानन काळेंकडून शरद पवार-बृजभूषणसिंहांचा फोटो ट्विट, म्हणाले “ब्रिज”चे निर्माते

मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे यांनी एख फोटो ट्विटरवर शेअर करत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

गजानन काळेंकडून शरद पवार-बृजभूषणसिंहांचा फोटो ट्विट, म्हणाले “ब्रिज”चे निर्माते
SHARES

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला. त्यानंतर तिथले भाजपचे स्थानिक खासदार बृजभूषणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंना जाहीर विरोध करायला सुरुवात केली. हा विरोध एवढा टोकाला गेला की शेवटी राज ठाकरेंनी दौरा तुर्तास रद्द करण्याचं जाहीर केलं.

पुण्यात राज ठाकरेंची सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी हा एक सापळा असून त्याचे अनेक पापुद्रे असल्याचं जाहीर केलं. तेव्हापासून राज ठाकरेंच्याविरोधात सापळा कोण रचतंय याची चर्चा सुरु झाली. याच संदर्भात मनसेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे यांनी एख फोटो ट्विटरवर शेअर करत शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

गजानन काळेंनी तीन फोटो ट्विट केलेत. या तीनही फोटोत बृजभूषणसिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार दिसतायत. मावळमधल्या एका कुस्तीच्या कार्यक्रमातले हे फोटो आहेत. पण तीनही फोटोत एक समानता म्हणजे बृजभूषण यांच्यासोबत पवार, सुप्रियांचा फोटो.

यावर गजानन काळेंनी “ब्रिज” चेनिर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …( फोटो झूम करून पाहावा…) असं लिहिलं आहे. तसंच फोटो झूम करून बघा असंही त्यांनी लिहलंय.

राज ठाकरे पुण्याच्या सभेत म्हणाले होते की, पुण्यात मी अयोध्येला जाणार असल्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहिती मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. हा सगळा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकून पडू नये. म्हणून अयोध्येला जायचं नव्हतं या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते.हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्यांचा आरोप

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच - संजय राऊत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा