Advertisement

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच - संजय राऊत

राज ठाकरे यांचा अयोध्या स्थगित झाला असला तरी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणारच आहे.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच - संजय राऊत
SHARES

राज ठाकरे यांचा अयोध्या स्थगित झाला असला तरी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणारच आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमची तयारी सुरु असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.  

ते पुढे म्हणाले की, तिथे ते इस्कॉन मंदिरालाही भेट देणार आहेत. त्यांना तसे निमंत्रण आले आहे. तसेच आदित्य ठाकरे तिथे काही प्रमुख लोकांना भेटणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, रामलल्लाच्या दर्शनाला कोणीही जाऊ शकते. हा आमचा धार्मिक कार्यक्रम असून राजकीय नाही. शिवसेना आणि अयोध्या यांचे एक भावनिक नातं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते. राज्यात रामराज्य आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांना टोला लगावला आहे.

काही पक्षांचे देखील अयोध्येत कार्यक्रम होते. मात्र, त्यांनी ते रद्द केले. त्यांना जर काही सहकार्य हवे असते तर आम्ही केले असते असेही संजय राऊत म्हणाले. मात्र, राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजपने असं का केलं, हे समजत नाही. भाजपा अशीच महाराष्ट्राच्या नेत्यांचा वापर करून घेते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजप राजकीय स्वार्थासाठी अशा खेळी करते. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बर होईल. आपण वापरले जात आहोत हे काही लोकांना उशीरा समजले आहे. पण मला यामध्ये राजकारण करायचे नसल्याचे संजय राऊत म्हणाले.हेही वाचा

भाजपने राज ठाकरेंच्या बाबतीत असे हा केले समजत नाही - संजय राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अखेर स्थगित, मोठं कारण आलं समोर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा