Advertisement

भाजपने राज ठाकरेंच्या बाबतीत असे का केले समजत नाही - संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांना टोला लगावला आहे.

भाजपने राज ठाकरेंच्या बाबतीत असे का केले समजत नाही - संजय राऊत
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. ५ जूनला राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. पण प्रकृतीमुळे त्यांना दौरा स्थगित केला आहे. पण यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांना टोला लगावला आहे.

काही पक्षांचे देखील अयोध्येत कार्यक्रम होते. मात्र, त्यांनी ते रद्द केले. त्यांना जर काही सहकार्य हवे असते तर आम्ही केले असते असेही संजय राऊत म्हणाले. मात्र, राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजपने असं का केलं, हे समजत नाही. भाजपा अशीच महाराष्ट्राच्या नेत्यांचा वापर करून घेते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजप राजकीय स्वार्थासाठी अशा खेळी करते. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरं होईल. आपण वापरले जात आहोत हे काही लोकांना उशीरा समजले आहे. पण मला यामध्ये राजकारण करायचे नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र प्रकृती अस्वास्थामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे.

"आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं", असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अखेर स्थगित, मोठं कारण आलं समोर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा