Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अखेर स्थगित, मोठं कारण आलं समोर

पुढील कुठल्या तारखेला ते आयोध्या दौरा करणार हे अद्याप स्पष्ट नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अखेर स्थगित, मोठं कारण आलं समोर
SHARES

गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या अयोध्या दौरा स्थगित होणाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यांचा दौरा स्थिगत करण्यात आला आहे. पुढील कुठल्या तारखेला ते आयोध्या दौरा करणार हे अद्याप स्पष्ट नाही. पुण्यात २२ मे रोजी होणाऱ्या सभेत ते नवीन तारीख घोषित करण्याची शक्यता आहे.   

राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तूर्तास अयोध्या दौरा स्थगित. 

पुणे (Pune) दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला दौरा अर्धवट सोडला आणि ते मुंबईला (Mumbai) परतले होते. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत अधिकृत माहिती देणार होते. 

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरू झाली होती. उत्तर प्रदेशसाठी जवळपास ११ ट्रेन्सची बुकिंग करण्यात आली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र प्रकृती अस्वास्थामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे.

"आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं", असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभा 'या' तारखेला होणार

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा