Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभा 'या' तारखेला होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पुढे ढकलण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यातील सभा 'या' तारखेला होणार
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही सभा २१ मे रोजी होणार होती. आता ही सभा २२ मे रोजी पुण्यात होणार आहे.

हवामान बदल आणि पावसाची शक्यता असल्यामुळे ही सभा रद्द केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मनसे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागजकर यांनी दिली.

यावेळी वागजकर म्हणाले की, राज साहेबांनी एकदा ठरवले की, सभा घ्यायची तर सभा होणारच. मात्र, हवामान खात्याने आम्हाला दिलेल्या अंदाजानुसार २१ची सभा रद्द झाली असून मोठा पाऊस आला तर नदी पात्रात मोठे पाणी येऊ शकते. त्याची शक्यता लक्षात घेता या सभेचे नियोजन दुसऱ्या ठिकाणी करण्यात आले आहे. याबाबत नदी पात्र सोडून अन्य दोन ठिकाणी आम्हाला सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरे हे मुंबईतून निर्णय जाहीर केल्यानंतर सभेबाबत पुढील तारीख कळवण्यात येईल.

मनसेची सभा ही या आठवड्याच्या शेवटी होणार असल्याची माहिती वागस्कर यांनी दिली आहे. उगीच माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये, असेही वागस्कर यांनी सांगितले आहे. राजसाहेबांनी सांगितल्यानंतर पुढील तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे वागस्कर म्हणाले आहेत.

मंगळवार १७ पासून राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. या अगोदर मुंबई, औरंगाबाद येथे भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती.

अयोध्या दौऱ्याच्या अगोदर राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र ,पावसाच्या शक्यतेने ही सभा सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

...तर, निवडणुका घेण्यास काय अडचण? सुप्रिम कोर्टाचा सवाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा