नवाब मलिक जे.जे. रुग्णालयात दाखल

ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. त्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, ईडीनं बुधवारी ८ तासांच्या चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. अशातच नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तपासणीसाठी मुंबईतील भायखळा इथं असलेल्या जे. जे. रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर पोटदुखीची समस्या वाढल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. बुधवारी मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा

'डर्टी डझन' नेत्यांची नावं किरीट सोमय्या दिल्लीला घेऊन जाणार

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेचा छापा

पुढील बातमी
इतर बातम्या