Advertisement

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेचा छापा

शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर केंद्रीय तापस यंत्रणेने छापा मारला आहे

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेचा छापा
SHARES

शिवसेनेचे नेते आणि  मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर केंद्रीय तापस यंत्रणेने छापा मारला आहे. यशवंत जाधव यांची चौकशी केंद्रीय तापस यंत्रणांकडून सुरु आहे. या छाप्यात हाती काय लागणार याची उत्सुकता आहे.

शुक्रवारी पहाटेपासूनच चौकशीला सुरुवात झाली आहे. यशवंत जाधवांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा झडती घेत आहे. त्याचवेळी सीआरपीएफचे जवानही घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत. शिवसेनेचे नेते जाधव हे ईडीच्या रडारवर आहेत.

केंद्र सरकार भाजप नसलेल्या राज्यात काम करु देत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करण्यात येत आहे. त्यांचा वापर करुन कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा आणखी एका शिवसेना नेत्याची चौकशी सुरु झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा