शरद पवारांनी घेतला यू टर्न, मुंडेंचं मंत्रीपद वाचलं!

धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचं स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षानं नोंद घेतली, आहे, असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आता यू टर्न घेत आपली भूमिका सौम्य केली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांचं मंत्रीपद वाचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

धनंजय मुंडे यांच्याबाबत काल मी जेव्हा भूमिका मांडली, तेव्हा पूर्ण चित्र माझ्यासमोर नव्हतं. केवळ महिलेनं मुंडे यांच्यावर केलेले आरोप इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित होतं. त्यामुळंच ते गंभीर आहे, असा शब्द मी वापरला होता. आता नवनवीन माहिती पुढं आली आहे. 

मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवरच काही लोकांनी आरोप केले आहेत. त्यात माजी आमदार आणि भाजपचे (bjp) एक नेते, इतर पक्षांतील काही लोकं आणि एका विमान कंपनीच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं हा एखाद्यावर अन्याय ठरू शकतो, असं म्हणत शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली.

हेही वाचा- धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई निश्चित? शरद पवारांचं सूचक वक्तव्य

गुरूवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, माझ्या मते आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. पक्षातील (ncp) सहकाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊनच पुढील पाऊल टाकलं जाईल. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याची कारण नाही, असं  शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान, करूणा शर्मा नावाच्या महिलेसोबत आपले परस्पर सहमतीने संबंध असून त्यातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. परंतु केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी रेणू शर्मा आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी केला होता.

(ncp chief sharad pawar reacts on dhananjay munde resignation)

हेही वाचा- कौटुंबिक विषयांत राजकारण नको, मुंडे प्रकरणात संजय राऊत यांचं मत
पुढील बातमी
इतर बातम्या