Advertisement

धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई निश्चित? शरद पवारांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्यावरील कारवाईबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई निश्चित? शरद पवारांचं सूचक वक्तव्य
SHARES

बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावरील कारवाईबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं की, धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. या प्रकरणात त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असल्यानेच उच्च न्यायालयात जात त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही.

हेही वाचा- कौटुंबिक विषयांत राजकारण नको, मुंडे प्रकरणात संजय राऊत यांचं मत

मात्र माझ्या मते आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. पक्षातील (ncp) सहकाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊनच पुढील पाऊल टाकलं जाईल. याला जास्त वेळ लागेल, असं वाटत नाही. कोर्टातील गोष्टींमध्ये मी पडत नाही, पण पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागलीत ते तातडीने घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्याची कारण नाही, असं पवार म्हणाले.

या प्रश्नावर राजकारण होत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, मी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं वक्तव्य वाचलं. त्यांनी यामध्ये संयमाने जाण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पक्षप्रमुखांचं हे मत असेल आणि इतरांचं दुसरं असेल तर अशा परिस्थितीचा फायदा विरोधकांकडून केला जात आहे, याबद्दल अधिक सांगायची गरज नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.

दरम्यान करूणा शर्मा नावाच्या महिलेसोबत आपले परस्पर सहमतीने संबंध असून त्यातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. परंतु केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप केले जात असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला होता. हा खुलासा त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. 

(ncp chief sharad pawar reaction over rape allegation on dhananjay munde)

संबंधित विषय
Advertisement