Advertisement

कौटुंबिक विषयांत राजकारण नको, मुंडे प्रकरणात संजय राऊत यांचं मत

संजय राऊत यांनी बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडू पाहणाऱ्या भाजपला सुनावलं.

कौटुंबिक विषयांत राजकारण नको, मुंडे प्रकरणात संजय राऊत यांचं मत
SHARES

हा पूर्णपणे धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यामुळे कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये, असं वक्तव्य करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडू पाहणाऱ्या भाजपला सुनावलं.

राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे आणि शरद पवारांनी (sharad pawar) सांगितलं आहे.

हे प्रकरण आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (ncp) नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल करून का घेतली नाही, यावर मला भाष्य करता येणार नाही. मात्र, या विषयाचं भांडवल केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल, असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा- धनंजय मुंडेंची आमदारकी संकटात?; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

रेणू शर्मा यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, धनंजय मुंडे (dhananjay munde) माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत. ते कुणीच नव्हते, तेव्हापासून १९९६ पासून मी त्यांना ओळखते. तेव्हा ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते. १९९८ साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहयचे. त्यावेळी मी १६-१७ वर्षांची असेन. माझी बहीण बाळ झाल्यानंतर इंदौरला घरी गेली होती. तेव्हा घरात कुणी नसताना त्यांनी माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला आहे. 

शिवाय बलात्काराची तक्रार दाखल करूनही अद्याप धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस स्टेशन माझी तक्रारसुद्धा दखल करून घ्यायला तयार नाही, असा दावा देखील रेणू शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान करूणा शर्मा नावाच्या महिलेसोबत आपले परस्पर सहमतीने संबंध असून त्यातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. परंतु केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप केले जात असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला.

(shiv sena mp sanjay raut reaction over rape allegation on dhananjay munde)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा