कदम यांना अटक झालीच पाहिजे, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मागणी

भाजपा आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात नारेबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. जोपर्यंत पोलिस कदम यांना अटक करत नाही, तोपर्यंत पोलिस चौकी सोडणार असा पवित्रा घेत, या महिला कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या चीरा नगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

घरापुढे नारेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी थेट भाजपा आमदार राम कदम यांच्या घरावर हल्लाबोल केला. कदम यांच्या घरासमोर जमून या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला काळं फासत, चपलांचा प्रसाद दिला. सोबत जोरदार घोषणाबाजी करत कदम यांच्या अटकेची मागणीही केली.

ठिय्या आंदोलन

त्यानंतर या महिला वळल्या त्या चिराग नगर (घाटकोपर) पोलिस ठाण्याच्या दिशेने. इथं या महिला कार्यकर्त्यांनी आ. कदम यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी नकार दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. विद्या चव्हाण आणि महिला पदाधिकाऱ्यांनी या पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


हेही वाचा-

धाडस असेल तर कदमांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी


पुढील बातमी
इतर बातम्या