Advertisement

"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी


"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी
SHARES

दहीहंडीच्या उत्सवादरम्यान मुली पळवण्यासंदर्भात बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राम कदम यांच्या त्या वक्तव्याचा निषेध मनसेनं देखील पोस्टरबाजीतून केला आहे. घाटकोपर, भिवंडी आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मनसेनं लावलेले हे पोस्टर्स पोलिसांनी काढून टाकले आहेत


पोस्टरमध्ये काय आहे 

पोस्टरमध्ये ''राम नव्हे रावण'', असा राम कदम यांचा उल्लेख करण्यात आला आहे. "वाह रे भाजपा सरकार. वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार. मतदारांनो आपल्या मुलींना सांभाळा. स्वयंघोषित दयावान, डॅशिंग भाजप आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहे. जर आमदार किंवा त्यांच्या बगलबच्च्यांनी असे केले तर पोलिसात तक्रार करा आणि आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी'',  असा मजकूर पोस्टरमध्ये लिहिला आहे. घाटकोपर, भिवंडी आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.



राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यात अश्या प्रकारचे सत्ताधारी पक्ष्याच्या आमदारानं वक्तव्य करणं म्हणजे अश्या घटनांना प्रोत्साहन देण्याचं काम राम कदम यांनी केलं आहे. यातून एखादी घटना घडली तर पळवणाऱ्याचे आणि त्याला सहकार्य करणाऱ्याचे दात आणि पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

- गणेश चुक्कल, नेतामनसे

दरम्यान राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटरवर दिलेल्या मेसेजमध्ये ते म्हणाले की, 'कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.अर्धवट 54 Sec विधान काही विरोधकांनी पसरवून सम्भ्रम निर्माण केला.दुसऱ्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यानी आक्षेप घेतला नाही कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकलं होतं.'



घाटकोपर इथल्या दहीहंडी उत्सवात गोविंदांशी बोलताना राम कदम म्हणाले होते की, नकार असला तरीही मुलगी पळवून आणण्यात तुमची मदत करतो. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी राम कदम यांना धारेवर धरलं आहे



हेही वाचा

राम नव्हे, हे तर 'रावण' कदम! नवाब मलिक यांची जहरी टीका


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा