नितेश राणे लढणार भाजपच्या तिकीटावर?

खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर ते कणकवलीतून भाजपच्या तिकीटावर लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. यावर शिवसेनेची काय प्रतिक्रिया असेल, हे अजून कळू शकलेलं नाही.  

पक्षप्रवेशाकडे लक्ष

नारायण राणे भाजपाच्या जागेवर राज्यसभेत निवडून गेले असले, तरी अजूनही त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही. आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास ते इच्छुक आहेत. परंतु शिवसेनेच्या विरोधामुळे हे विलिनीकरण रखडलेलं आहे. शिवाय राणे यांचे चिरंजीव निलेश आणि नितेश राणेही भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या भाजपप्रवेशाकडे लागलं होतं.    

कोंडी दूर

अखेर कणकवलीमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीतच कणकवलीच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाल्याने ही कोंडी दूर झाली आहे.

नारायण राणे यांच्याबद्दलचा कुठलाही निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. त्यामुळे नितेश राणे यांच्या बाबतीत शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच हा प्रवेश झाला की नकळत यावर शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा-

नितेश राणेंचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमधून लढण्याची तयारी

आदित्य ठाकरेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट


पुढील बातमी
इतर बातम्या