नितेश राणेंचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमधून लढण्याची तयारी

नितेश राणे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

SHARE

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नितेश आणि निलेश राणे या दोन्ही मुलांसोबत भाजपात जाण्याची तयारी सुरू केली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नितेश राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. त्यानुसार नारायण राणे बुधवारी २ ऑक्टोबर रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत नितेश आणि निलेश राणेही भाजपात प्रवेश करतील, असं नारायण राणेंनीच सांगितलं होतं. 

 नितेश राणे यांचा कणकवली देवगड मतदारसंघ भाजपाच्या कोट्यात येत असल्याने नितेश राणे इथून भाजपाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

यादीत नाव नाही, तरीही खडसेंनी कसा भरला अर्ज?

वडाळ्याची जागा कोळंबकरांना, श्रद्धा जाधव करणार का बंड?संबंधित विषय
ताज्या बातम्या