Advertisement

यादीत नाव नाही, तरीही खडसेंनी कसा भरला अर्ज?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत नसूनही त्यांनी मुक्ताईनगर या मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यादीत नाव नाही, तरीही खडसेंनी कसा भरला अर्ज?
SHARES

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत नसूनही त्यांनी मुक्ताईनगर या मतदारसंघातून मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 

अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खडसे म्हणाले की, चांगला मुहूर्त असल्याने मी माझा उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. पहिल्या यादीत नाव आलं नसलं, तरी दुसऱ्या यादीत नाव येऊ शकतं. 

खडसे यांचं नाव भाजपच्या पहिल्या यादीत न आल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, गेल्या ४२ वर्षांपासून मी भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे. या काळात मला अनेक प्रलोभने आली, पक्ष सोडण्यासाठी अनेकांकडून दबाव आला, पण मी पक्षासोबत कायम राहिलो. पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर मी हा गुन्हा केला आहे, असं खडसे म्हणाले. 

शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत मुक्ताईनगरची जागा नसल्याने खडसे यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचं म्हटलं जात असलं, तरी भाजपच्या दुसऱ्या यादीत खडसेंचं नाव असेल, की आणखी दुसऱ्याचं याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागलं आहे.  



हेही वाचा-

वडाळ्याची जागा कोळंबकरांना, श्रद्धा जाधव करणार का बंड?

भाजप-शिवसेना महायुतीवर शिक्कामोर्तब, पण जागावाटप कधी?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा