तोपर्यंत मेगाभरती नाही - मुख्यमंत्री

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसेच राज्य मागास वर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नोव्हेंबर पर्यंत मराठा आरक्षणाबाबतची सर्व प्रक्रिया राज्य सरकार पूर्ण करेल. जर प्रक्रिया पूर्ण न झाल्यास विशेष अधिवेशन बोलावणार, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. 

'याशिवाय मेगाभरती नाही'

'मेगाभरतीच्या निर्णयामुळे मराठा समाजाला असं वाटतं की आपल्यावर अन्याय झाला. मात्र मेगाभरतीची प्रक्रिया आम्ही सुरू केली नाही आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय मेगाभरती सुरू केली जाणार नाही', असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

'सत्य माहिती देण्यासाठी हा संवाद'

मराठा समाजातील आरक्षणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून सत्य माहिती देण्यासाठी हा संवाद असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. याशिवाय इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. मात्र तरुणांनी आत्महत्या करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी मराठा क्रांती मोर्चात सामील तरुणांना केलं.

फक्त अध्यादेश काढून प्रश्न मार्गी लागणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरच येईल. उच्च न्यायालयाने तसे आदेशही दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


हेही वाचा -

मग आरक्षणाचा काय उपयोग?

पुढील बातमी
इतर बातम्या