'हे' आहेत सर्वाधिक वार्षिक कमाई असणारे आमदार

देशातील सर्वाधिक वार्षिक कमाई असणाऱ्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील ४ आमदार आहेत. यामध्ये पहिल्या स्थानावर भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा आहेत. लोढा हे बिल्डर असून त्यांची वार्षिक कमाई ३३ कोटी २५ लाख रुपये आहे. लोढा ग्रुपमध्ये लोढा यांचे वर्णन पगारदार असं करण्यात आलं आहे.  देशात लोढा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

मावळत्या तेराव्या विधानसभेतील सर्वाधिक वार्षिक कमाई असणाऱ्या राज्यातील आमदारांमध्ये दिलीप सोपल हे दुसऱ्या स्थानावर आहेत.  सोपल यांची वार्षिक कमाई ९ कोटी ८५ लाख रुपये आहे. सोपल हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार आहेत. नुकतंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोपल हे वकील आणि शेतकरी आहेत. सोपल देशात ६ व्या स्थानावर आहेत. 

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे वार्षिक कमाईत तिसऱ्या स्थानावर आहेत. ठाकूर हे भाजपाचे आमदार असून ते शेतकरी आहेत. त्यांना मशीन्स भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ठाकूर हे वार्षिक कमाई सर्वाधिक असलेल्या देशातील २० आमदारांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आहेत. राज्यात चौथ्या स्थानावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाण हे दक्षिण कऱ्हाडचे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांची वार्षिक कमाई ४ कोटी ३४ लाख रुपये आहे. देशात चव्हाण २० व्या क्रमांकावर आहेत. 


हेही वाचा -

विधानसभा निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू


पुढील बातमी
इतर बातम्या